Product Details
आशयातील नाविन्य व्यक्त करणारी `सुनीते` ‘गोंदण’ हा शान्ताबार्इंचा तिसरा कवितासंग्रह. आधीच्या कवितांतून व्यक्त होणारी ज्येष्ठांच्या अनुकरणाची प्रवृत्ती, शैलीतली सांकेतिकता, शब्दांचा सोस या गोष्टींचा ‘गोंदण’मधील कवितांमध्ये क्वचितच आढळ होतो. इथे कवयित्री आपल्या अनुभवविश्वाचा अधिक खोलवर शोध घेत आहे आणि त्या अनुभवांचे केवळ वर्णन करण्याऐवजी त्यांचा प्रत्यय वाचकांना देण्याची धडपड करत आहे, असे जाणवते. तसेच छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध कवितांच्या जोडीला अनेक कवितांतून मुक्तछंद किंवा मुक्तरचना यांचा वापर इथे प्रथमच केलेला दिसतो. उपमारूपकांऐवजी प्रतिमांची योजना जाणीवपूर्वक केली जात आहे, असेही प्रत्ययाला येते. तरीही जुन्या कवितेशी असलेले आपले अनुबंध शान्ताबाई अद्याप जपत आहेत. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली; पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते ‘गोंदण’मध्ये आहेत. ही सुनीते ‘गोंदण’चे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8171618545 |
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types