Product Details
दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ नंतरचा हा दुसरा कवितासंग्रह. त्यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनानं मराठी साहित्याला मोलाचं योगदान दिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांचा लौकिक ‘बलुतं’मुळंच पोहोचला. असं असलं तरी दया पवारांचा मूळ िंपड हा अखेरपर्यंत अस्सल समकालीन कवीचाच राहिला. ‘कोंडवाडा’मधून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी कविता नोंदवली. विद्रोहाच्या तप्त आवाजाच्या कोलाहलातही स्पष्टपणे ऐवूâ येणारी साधी, संयत आणि न एकारलेली. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ मध्ये हा शोध अधिक प्रगल्भतेनं आणि समग्रपणे व्यक्त झाला आहे. दया पवारांच्या संवेदनशीलतेला या संग्रहात आणखी एक महत्त्वाचं परिमाण लाभलं आहे. सर्वांत पायतळी असलेल्या कष्टकरी, दलित स्त्रीच्या अपार दु:खाचं. लोकगीताच्या देशीय रूपबंधातून दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवारांनी अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं जागता ठेवला. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ या संग्रहाच्या शीर्षओळीपासूनच हे जाणवतं की, दलित स्त्रीच्या जगण्यात – तिच्या आqस्तत्वात, दया पवार सबंध व्यवस्थेचं प्रतिरूप अनुभवतात. भारताच्या सांस्कृतिक बेटांमधली दरी नाहीशी व्हावी यासाठी ‘माझी कविता बळी पडली तरी चालेल,’ असे दया पवारांनी कोंडवड्याच्या प्रस्तावनेत लिहिले आहे... ‘धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात, तसं आपण हसत मरावं...’ त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’मधूनही शेवटपर्यंत जाणवतो. कवी दया पवारांचे ‘समकालीनत्व’ अधोरेखित करणारा हा संग्रह मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहात अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरावा. प्रा. प्रज्ञा लोखंड
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788171618189 |
No.Of.Pages
|
56 |
Shades / Types