Product Details
२००४मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ‘माध्यम सल्लागार’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांना ही नोकरी देताना असं म्हटलं होतं, ‘‘या कार्यालयात बसून माझा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जे काही कानावर पडावं, असं तुम्हाला वाटत असेल, ते अजिबात न घाबरता, नि:पक्षपाती वृत्तीनं जसं असेल तसं मला सांगा!’’ ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामध्ये डॉ. सिंग यांच्याविषयीचं जनमत बनवणं हा अनुभव काय होता, हे त्यांनी सांगितलं आहे. पडद्यामागे घडणा-या भारतीय राजकारणाची नवीन दृष्टी त्यांनी आपल्या खिळवून टाकणा-या शैलीत वाचकाला दिली आहे. डॉ. सिंग यांचे ‘स्पिन डॉक्टर’ आणि चार वर्षं खास त्यांच्या विश्वासातले असलेल्या संजय बारु यांनी डॉ. सिंग यांचे त्यांच्या मंत्र्यांशी असलेले तणावपूर्ण संबंध, सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेलं त्यांचं सावध समीकरण अगदी जवळून पाहिलं आहे. डाव्या पक्षांना हाताळतानाचं आणि अणुकराराचा पाठपुरावा करतानाचं डॉ. सिंग यांचं कौशल्यही त्यांनी पाहिलं आहे. ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184985498 |
No.Of.Pages
|
344 |
Shades / Types