Product Details
पूल, सेतू हे दोन भाग, गाव, शहर, देश तसेच दोन संस्कृतींना जोडणारे माध्यम आहे. पाण्याचा ओघळ ओलांडण्यासाठी आदीमानवाने लाकडी ओंडक्याचा व झाडाच्या खोडाचा वापर केला. नंतर हळूहळू पूल बनविण्याचे तंत्र विकसित झाले. आज जगभरात हजारो पूल बांधलेले आहेत. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण, लांबी, रुंदी, उंची यांचे उच्चांक गाठणारे जगातील बारा पुलांची कहाणी सुधीर शं. कुलकर्णी यांनी ‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’मधून सांगितली आहे. भारत, चिन, जपानमधील प्रत्येकी दोन, अमेरिकेतील तीन, फ्रांस, हंगेरीतील प्रत्येकी एक, ऑस्ट्रेलियातील एक अशा १२ पुलांची माहिती यात आहे केवळ तांत्रिक, आकडेवारी नसून पुलंचा इतिहास, पार्श्वभूमी, डिझाईन, पूल बांधणीविषयीची वैशिष्ट्ये सोप्या भाषेत सांगितली आहे. मानवाच्या प्रगतीचे व तंत्रज्ञानाच्या विकासाची झलक दाखविणाऱ्या पुलांसंबंधीची रंजक माहितीही मिळते.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
207 |
Shades / Types