Product Details
मुल नसलेल्या दाम्पत्याला मुल दत्तक घेण्याचा पर्याय उपलब्ध असला, तरी हा पर्याय सर्वच स्वीकारताना दिसत नाहीत. सामाजिक स्थिती आता बदलताना दिसते. दत्तक घेण्याचं प्रमाणही वाढत आहे. मात्र, मुल होण्याची क्षमता असतानाही दत्तक घेण्याचं धाडस एका स्त्रीची कथा प्रगती कोळगे यांनी रंगविली आहे. अमेरिकेत वास्तव्य करणारी एक स्त्री मुलगी दत्तक घेण्याचा आग्रह धरते. एका अनाथ बालिकेला मायेचं घर लाभावं, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र, ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नसते. विशेषतः ही सामाजिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, हे तिच्या लक्षात येतं. या प्रक्तीयेचं, समाजाच्या दृष्टीकोनाचं दर्शन पुस्तकातून घडतं.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
134 |
Shades / Types