Product Details
मनातसुद्धा येत नाही पण दैनंदिन जीवनात आपण सहजपणे सोयीचे आकार निवडतो. मग ते बॉलपेन असो की बादली. पुढे आपण ते सगळं विसरतो. मात्र निसर्गातले आकार स्मरणार राहतात तसेच मानवनिर्मित आकारांना मनापासून दाद दिली जाते. अजिंठ्याची घळीचा नैसर्गिक आकार आणि डोंगर खोदून ओबडधोबड दगडांना दिलेले आकार जन्मभर लक्षात राहतात. पद्मपाणी बुद्ध, ब्लॅक प्रिन्सेस, पाहतपाहत सव्विसाव्या लेणीतील तेवीस फुट लांबीचा बुद्धाचा पुतळा नजर वेधतो. पण जेव्हा कळतं की तो निर्वाणाच्या वाटेवर आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहून पोटात खड्डा पडतो. माणसात असलेल्या देवत्वाचं रुपांतर दगडात प्रकट होतं तेव्हा मन अथांग विचारात बुडून जात. वेरुळच्या कैलास मंदिरात मन हबकतं. स्वतःच्या प्रत्येक कृतीतील तोकड्या प्रयत्नांची जाणीव होते. कोणतंही काम किती चिकाटीनं करायला हवं ते कोणी न सांगता ते आकार सांगतात. अज्ञात कलावंतांनी अथक प्रयत्नांनी निर्माण केलेल्या शिल्पकृती मनाला बळ देतात. जगण्याची उभारी देतात. निरर्थकतेचे विचार अनेक योजने दूर पळवतात. हे लेखन चिरंतन आकारांचा सचित्र परिचय घडवतं. तसंच अनेक कृतींचा आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेकडे औत्सुक्यानं पाहातं.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
88 |
Shades / Types