गणपती, पोहे, पापड आणि मीठागरे यांसाठी पेण प्रसिद्ध आहे. घाटमाथा आणि उत्तर कोकण जोडणार्या मोक्याच्या ठिकाणी वसल्यामुळे त्यास ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व प्राप्त झाले. लेण्यांच्या काळातील खुणा आणि स्वातंत्र्यकाळातील इतिहास सांगणारे पेणही आता शहरी वळण घेत आहे. त्याची ही कहाणी.