Product Details
शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत यशस्वी होऊ न शकलेल्या मुलांना आणि प्रौढांना समाज पटकन दोषी धरतो. मात्र खरी गरज असते ती त्यांच्यातील क्षमतांना असणार्या मर्यादांसह त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची. मानसशास्त्रातील (सायकॉलॉजी- इं.) आणि मज्जामानसशास्त्रातील (न्यूरॉसायकॉलॉजी- इं.) प्रगतीने आपल्याला ‘मानसा’कडे आणि त्यामुळेच ‘माणसा’कडे पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल केली आहे. त्यामुळे हे आता शक्य झाले आहे. लेखन, वाचन व इतर अभ्यास याबाबतच्या शाळेच्या अपेक्षा काही मुले पुर्या करू शकत नाहीत. या मुलांना कोणत्या अडचणी येतात, त्या कशामुळे येतात व आपण त्यांना कशी मदत करू शकतो याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात आहे. ‘शिक्षणाचा अधिकार’ सर्वांसाठी लागू झाल्याचे लक्षात घेता या पुस्तकाचे महत्त्व विशेष आहे. अध्ययन-अक्षमता या विषयाचा सखोल परामर्ष घेणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. पालक, शिक्षक, शिक्षणक्षेत्रातील पदाधिकारी, मानसशास्त्राचे अभ्यासक, रेमेडियल टीचर्स अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-431-8 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
200 |
Shades / Types