Product Details
शेअरिंग, पर्सनल एक्स्प्रेशन, टेक्नॉलॉजी हे या शतकातले आपले परवलीचे शब्द. प्रत्येकालाच आपले छोटे छोटे अनुभव व्हिज्युअल माध्यमातून व्यक्त आणि शेअर करण्याची उत्सुकता असते. प्रत्येकाचाच स्वतंत्र असा एक क्रिएटिव्ह विचार असतो. त्यासाठी तंत्रज्ञानही सहज उपलब्ध असतं. एका अर्थी प्रत्येकाच्या मनात एक ‘शॉर्ट फिल्म’ तयार असते. पण फक्त गॅजेट वापरता आलं म्हणजे विचार व्यक्त होत नाहीत. त्यासाठी गरज असते, शास्त्रशुद्ध पद्धतीने तंत्रज्ञान आत्मसात करून घेण्याची. तसंच जगभरातल्या दिग्गजांनी केलेल्या उत्तम शॉर्ट फिल्म्सचं रसग्रहण करून व्हिज्युअल माध्यम समजून घेण्याची. ‘शॉर्टकट’ मधून लघुपटाच्या कल्पनेपासून प्रत्यक्ष लघुपट तयार होईपर्यंतचा लघुपटाचा प्रवास उलगडला आहे. तंत्रज्ञान, शॉर्टफिल्म मेकिंग, या माध्यमाची भाषा, त्याचं व्याकरण आणि त्यातील बारकावे सोदाहारण सांगितले आहेत. स्केचेस,फोटोग्राफ्स आणि निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यासाठीच्या टिप्सही आहेत. आणि आहे उत्तमोत्तम लघुपट व माहितीपटांचं रसग्रहण. लघुपट निर्मितीच्या अनेक वर्षांच्या अनुभवांचं एका दिग्दर्शकानं केलेलं ‘शॉर्टकट’ हे एक क्रिएटिव्ह शेअरिंग आहे!
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-41-7 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
280 |
Shades / Types