Product Details
मुलांच्या निरीक्षणशक्तीला, विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी शिक्षक आणि पालकांना क्रमिक पाठ्यपुस्तकांशिवाय इतर साधनांवरही अवलंबून राहावं लागतं. या हेतूने चित्रवाचन हे पुस्तक तयार करण्यात आलं असून या साधनामुळे मुलांचा अभ्यास रंजक व आनंददायी पद्धतीने घेता येईल. या पुस्तकात विविध प्रकारची चित्रं देण्यात आली असून पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना त्या चित्रांबद्दल प्रश्न विचारून त्यातील तपशील सांगण्यास उद्युक्त करावं. यामुळे मुलांचा भाषिक तसेच मानसिक विकास होतो. मातृभाषा, द्वितीय भाषा किंवा परकीय भाषा शिकणार्या कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे साधन उपयुक्त आहे. या चित्रांचा शिक्षणात कल्पकतेने आणि वेगवेगळ्या अंगाने कसा उपयोग करावा यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही पुस्तकात दिल्या आहेत.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
81-7925-136-5 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
24 |
Shades / Types