Product Details
मोबाईल फोनशिवाय आपलं आयुष्य आता अशक्य झालं आहे. आपल्या हाता-पायांसारखाच मोबाईल फोन हा जणू एक अवयवच बनला आहे. जगभरात सगळीकडे मोबाईल फोनचा वापर काही दशकांमध्येच इतका प्रचंड वाढेल अशी कल्पना कुणी केली तरी असेल का? अशा या मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानामागे किती शास्त्रज्ञांचे आणि संशोधकांचे अफाट परिश्रम आहेत याची जाणीव झाली की त्यांच्या प्रयत्नांना आपण सलामच ठोकू. इतक्या छोट्या उपकरणामध्ये संदेशवहनाच्या संदर्भातली आमूलाग्र क्रांती घडवण्याची क्षमता कशी येत गेली याची ही कहाणी आहे. मोबाईल फोनचा अत्यंत सनसनाटी इतिहास सादर करताना हे पुस्तक या तंत्रज्ञानाच्या मुळाशी असलेल्या चुंबकत्वाच्या आणि विजेच्या शोधाचा मागोवा घेतं. अनेक सुटे धागे जुळवत जुळवत शेवटी आपण मोबाईल फोनपर्यंत कसे पोहोचलो आणि त्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट यांच्या एकत्रिकरणातून स्मार्टफोनच्या अत्याधुनिक उपकरणाचा वापर कसा करायला लागलो या संदर्भातली संपूर्ण माहिती हे पुस्तक आपल्यासमोर अत्यंत रंजक भाषेत सादर करतं.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-96-7 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
216 |
Shades / Types